Date of Publication: 12/15/2025
Abstract:
सर्वसामान्य, बहुजन समाज निरक्षरता, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता यातून कायमचा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या समाजपुरूषांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणारे संत गाडगेबाबा आहेत. खेड्यामधील भोळ्याभाबड्या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या भाषेत, सहज सोपे करून सांगणाऱ्या लोकोत्तर आणि लोकसंस्कारपीठ असलेल्या गाडगेबाबांच्या समतावादी आणि पुरोगामी विचारसरणीचा प्रत्यय समाजाला व्हावा. या त्यांच्या विचारसरणीची प्रेरणा घेऊन समाजाचे दिशादर्शन व्हावे. याकरिता सदरच्या संशोधन लेखामधून त्यांच्या विचारसरणीची उदारणांसह आणि जीवनानुभवांसह मांडणी केली आहे.
Keywords :
संत गाडगेबाबा, गाडगेबाबांचे विचार, पुरोगामी आणि समतावादी संत गाडगेबाबा, संत गाडगेबाबांचे वैचारिक कार्य इ.
