Date of Publication: 01/02/2026 (Draft Issue)
प्रस्तावना-
भारतीय अध्यात्मपरंपरेत रामायण हे केवळ एक महाकाव्य “भारतीय सांस्कृतिक आदर्शांचे प्रतीक” “आणि सामाजिक संरचना सांगणारा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.” रामकथेत राम, सीता, लक्ष्मण, भरत इत्यादी प्रमुख पात्रांच्या सोबत अनेक गौण पात्रांचाही उल्लेख आलेला आढळतो. “तथापि स्त्री ‘शांता’ (रामाची बहीण) हे एक उल्लेखनीय” परंतु कमी चर्चिले गेलेले पात्र आहे. श्रुतिग्रंथांत तिच्या पौराणिक माहितीचा उल्लेख आलेला आढळतो. परंतु विविध पुराणे, उपपुराणे, स्थानिक आख्यायिका, उत्तररामचरितासारखी नाटके आणि आधुनिक साहित्य यांमधून तिचे जीवन, विवाह आणि तिची सामाजिक-धार्मिक भूमिका दिसून येते. ‘शांता’ हिच्या कथेशी दुष्काळ निवारण, ऋष्यश्रृंगांचे आगमन, पुत्रकामेष्टी यज्ञ आणि रामाचा जन्म या गोष्टी आपल्याला दिसतात. यामुळे तिचे स्थान रामायण-परंपरेत वेगळे महत्त्व प्राप्त करते. तरीही तिची माहिती प्रत्येक ग्रंथामध्ये वेगळी आणि लोकपरंपरेमध्ये अधिक जतन झालेली असल्यामुळे तिच्या अभ्यासाची आवश्यकता जास्त जाणवते. काही ग्रंथांतील उल्लेख ‘शांता’ ही दशरथाची दत्तक कन्या व रामाची मोठी बहीण म्हणून ओळखली जाते. तिचा विवाह ऋष्यशृंग मुनिशी झाला, असा वाल्मिकीरामायणात उल्लेख आलेला आहे. तिची कथा मुख्यतः पुराणांमध्ये अनेक नंतरच्या रामकथांमध्ये विस्ताराने आलेली आहे. वाल्मीकि रामायणात तिचा उल्लेख अत्यल्प आहे. पण बालकांडात राजा लोमपाद (अंगदेशाच्या राजाचा) ऋष्यश्रृंग ऋषी जावई म्हणून उल्लेख दिसतो. अंगराज लोमपादाने ऋष्यशृंग आपल्या राज्यात आणून यज्ञकार्य संपन्न केले. यामुळे नंतरच्या टीकांमध्ये व पुराणांत शांतेचा विवाह जोडला गेला आहे.

