Date of Publication: 12/15/2025
Abstract:
स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याने सामाजिक वास्तवाच्या विविध छटा प्रभावीपणे मांडल्या आहेत. दलित, स्त्री, ग्रामीण, आदिवासी आणि अल्पसंख्याक जीवनानुभव यांना साहित्यिक अभिव्यक्ती मिळू लागली. याच परंपरेत मुस्लिम मराठी साहित्यप्रवाह विकसित झाला. या प्रवाहाने केवळ धार्मिक ओळख मांडली नाही, तर सामाजिक अन्याय, दंगली, विस्थापन, असुरक्षितता, राजकीय शोषण आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास यांसारख्या प्रश्नांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. या प्रवाहातील महत्त्वाचे आणि प्रभावी कवी म्हणजे प्रा. जावेद पाशा कुरेशी. त्यांच्या कवितेचा आशय हा अनुभवप्रधान, वास्तवदर्शी आणि सामाजिक भान जागवणारा आहे. ते स्वतः अनुभवलेले, पाहिलेले आणि समाजमनावर खोल परिणाम करणारे प्रश्न कवितेतून मांडतात. त्यामुळे त्यांच्या कविता केवळ सौंदर्यवादी न राहता सामाजिक हस्तक्षेप करणाऱ्या कविता ठरतात.प्रा. कुरेशी यांच्या कवितेतील आशय हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाचे दु:ख, संघर्ष आणि आशा व्यक्त करतो. दंगल, अल्पसंख्याक जीवन, विस्थापन, भयग्रस्त मानसिकता, मानवी नात्यांचे तुटणे आणि माणुसकीचा शोध हे त्यांच्या कवितेचे प्रमुख आशयसूत्र आहेत.
Keywords :
मराठी मुस्लीम साहित्य, जावेद पाषा, विद्रोह
